इतर मागास वर्ग
इतर मागास वर्ग इतर मागास वर्ग किंवा ओबीसी (इंग्रजी: Other Backward Class / OBC ) हा सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग (समाज) आहे. भारतात बहुसंख्य समाज हा मागासलेला (Backward class) असून पुढारलेला समाज (Forward class) अल्पसंख्य आहे. या बहुसंख्य मागास समाजापैकी जो जास्त मागास आहे तो ‘मुख्य मागास’ समजला जातो. त्याला अनुसूचित जाती-जमाती म्हटले जाते. या मुख्य मागासांपेक्षा कमी मागासलेल्या समाजघटकांना ‘इतर मागास’ ठरविण्यात आलेले आहे. भारतातील ४१% ते ५२% लोकसंख्या ओबीसी आहे. [ संदर्भ हवा ] समाविष्ठ जाती मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या ३६०, तर देशात ओबीसी जातींची संख्या ३,७४४ इतकी नोंद केलेली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या राष्ट्रीय आयोगाने २,१७१ प्रमुख ओबीसींची यादी जाहीर केलेली आहे. ह्यांतील उपजाती जमेस धरल्यास ही संख्या आणखीही वाढू शकते. कुणबी , साळी , कोष्टी , तेली , भावसार , वाणी , शिंपी , नाभिक , परीट , गुरव , गवळी , जंगम ,...