इतर मागास वर्ग


इतर मागास वर्ग

इतर मागास वर्ग किंवा ओबीसी (इंग्रजी: Other Backward Class / OBC) हा सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग (समाज) आहे. भारतात बहुसंख्य समाज हा मागासलेला (Backward class) असून पुढारलेला समाज (Forward class) अल्पसंख्य आहे. या बहुसंख्य मागास समाजापैकी जो जास्त मागास आहे तो ‘मुख्य मागास’ समजला जातो. त्याला अनुसूचित जाती-जमाती म्हटले जाते. या मुख्य मागासांपेक्षा कमी मागासलेल्या समाजघटकांना ‘इतर मागास’ ठरविण्यात आलेले आहे. भारतातील ४१% ते ५२% लोकसंख्या ओबीसी आहे.संदर्भ हवा ]

समाविष्ठ जाती

मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या ३६०, तर देशात ओबीसी जातींची संख्या ३,७४४ इतकी नोंद केलेली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या राष्ट्रीय आयोगाने २,१७१ प्रमुख ओबीसींची यादी जाहीर केलेली आहे. ह्यांतील उपजाती जमेस धरल्यास ही संख्या आणखीही वाढू शकते.

कुणबीसाळीकोष्टीतेलीभावसारवाणीशिंपीनाभिकपरीटगुरवगवळीजंगमपांचाळफुलारीरंगारीसुतारकासारधनगरभंडारीतांडेलतांबटमोमीनघडशीविणकरआगरीकुंभारसोनारकोळीलोहारशिंपीमाळीबंजारा अशा अनेक जाती यामध्ये मोडतात.[१]

अ.क्र.जातीअ.क्र.जाती
1)अलितकार13)बारी  किंवा बारई
2)वगळले (बागडी)14)बेरीया
3)वगळले (बहुरुपी)15)बेसदेवा
4)बडीआ16)भडभुंजा, भूजवा, र्भूजवा, भूर्जी, भरडभूंजा, भूरंजी,भूंज
5)बजानिआ17)भांटा
6)बाजीगर18)भट, भाट
7)बुट्टाल19)चमथा
8)भांड, छप्परभांड, मुस्लीम भांड20)चांदलगडा
9)भवैया किंवा तारगल21)चरण किंवा गढवी
10)भाविण22)चारोडी
11)भिस्ती किंवा पखाली, सक्का23)चिप्पा, छिपा
12)वगळले (भोई)24)दास किंवा दांगडीदास
25)दावगर38)वगळले (गद्री)
26)देपला39)गढवी
27)देवळी40)वगळले (गारपगारी)
28)देवदिग, देवाडिगा, शेरीगार व मोईली (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट)41)वगळले (धोली)
42)गोचाकी
29)वगळले (ढीवर किंवा ढेबरा)43)गुरव लिंगायत गुरव ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
30)ढोली, हश्मी/डफली
31)वगळले (डोंबारी)44)वगळले, (गवळी)
32)वगळले (धनगर)45)गवंडी, गुर्जर-कडीया
33)वगळले (धीमर)46)हलेपैक
34)वगळले (देवांग)47)वगळले (हिलव)
35)गंधारप48)वगळले (हटकर)
36)गुजराथ बोरी49)जगीयासी
37)वगळले (गदारिया)50)जजाक

आरक्षण

या प्रवर्गास केंद्रात २७% तर महाराष्ट्र राज्यात १९% आरक्षणआहे.


Comments

Popular posts from this blog

एमपीएससी द्वारे भरली जाणारी पदे

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

एमपीएससी परीक्षेचे स्वरूप-